कोरोनाला हरवण्यासाठी नवी मुंबईचे आमदारही सरसावले

सकाळ न्यूज नेटवर्क 
Wednesday, 1 April 2020

कोरोनाविरोधात रणांगणात उतरलेल्या महापालिकेला अधिक बळकटी देण्यासाठी आमदार निधीतून तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. भाजपच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक या दोघांनी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी महापालिकेला देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनाशी लढण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर, पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट, कोरोना टेस्टिंग कीट, व्हेंटिलेटरची व्यवस्था होऊ शकणार आहे.

नवी मुंबई : कोरोनाविरोधात रणांगणात उतरलेल्या महापालिकेला अधिक बळकटी देण्यासाठी आमदार निधीतून तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. भाजपच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक या दोघांनी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी महापालिकेला देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनाशी लढण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर, पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट, कोरोना टेस्टिंग कीट, व्हेंटिलेटरची व्यवस्था होऊ शकणार आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळल्यापासून महापालिका आरोग्य विभाग त्यांच्या स्तरावर कार्यरत आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महापालिकेतर्फे वाशीच्या प्रथमसंदर्भ रुग्णालयात विविध खबरदारी घेतली जात आहे. विलगीकरण कक्षासोबत तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक महापालिकेने तैनात केले आहे. यासह शहरात आढळून येणाऱ्या कोरोनाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी शाळा व बहुउद्देशीय इमारतींमध्ये व्यवस्था केली आहे; मात्र तरीही आरोग्य विभागातील डॉक्‍टर, परिचारिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. महापालिकेला भेडसावणाऱ्या समस्यांतून सुटका करण्यासाठी दोन्ही आमदारांनी दिलेल्या एक कोटीच्या निधीचा फायदा महापालिकेला होणार आहे. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय, नेरूळ व बेलापूर येथील माताबाल रुग्णालय येथे आयसीयू व्हेटिलेटर उपलब्ध करण्यासाठी मंदा म्हात्रेंनी 50 लाखांचा निधी देऊ केला आहे. इन्फ्रारेड थर्मामीटर, पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट, कोरोना टेस्टिंग कीट, व्हेंटिलेटर, मास्क, सॅनिटायझर आदींची व्यवस्था करण्यासाठी गणेश नाईक यांनी 50 लाखांचा निधी उपलब्ध करण्यास दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 lakh each of Manda Mhatre, Ganesh Naik for nmc covid19