Mumbai : ५० हजार लाभार्थ्यांनी मुंबईबाहेर घेतला दुसरा डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

५० हजार लाभार्थ्यांनी मुंबईबाहेर घेतला दुसरा डोस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोना लशीचा पहिला डोस घेतलेल्या सुमारे पावणेपाच लाख लाभार्थ्यांनी दुसरा डोस चुकवला आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम प्रभाग स्तरावर बांधण्यात आलेल्या वॉर रूमवर सोपवण्यात आले आहे. आतापर्यंत केलेल्या कॉल्स आणि घरोघरी जाऊन राबवलेल्या शोध मोहिमेतून यापैकी ५० हजार लाभार्थ्यांनी मुंबईबाहेर दुसरा डोस घेतल्याचे समोर आले आहे.

मुंबईत सध्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीकरण केंद्रांवरील गर्दी आता नाहीशी झाली आहे. लसीकरण कमी होण्याचे प्रमुख कारण लाभार्थी लसीकरण केंद्रांवर पोहोचत नसल्याचे सांगितले जात आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, मुंबईत असे सुमारे ४ लाख ७३ हजार लाभार्थी आहेत, जे पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोसचा कालावधी उलटूनही लस घेण्यासाठी केंद्रावर पोहोचलेले नाहीत. ज्या लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला नाही, अशा सर्व लाभार्थ्यांना शोधण्याचे काम प्रभाग वॉर्ड रूमवर सोपवण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात २० ते २३ हजार लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी आलेले नाहीत. सुरुवातीला सर्व लाभार्थ्यांशी त्यांच्या मोबाईलवरून संपर्क साधला जात आहे. आतापर्यंत २४ वॉर्डांमध्ये झालेल्या संपर्कांपैकी ५०,००० लाभार्थ्यांपैकी बहुतांश लाभार्थ्यांनी मुंबईबाहेरील लसीकरण केंद्रांवर दुसरा डोस घेतला आहे; तर  वॉर रुमकडून जवळपास साडेचार लाख लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे.

loading image
go to top