ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा जोर वाढला; वाचा आजची आकडेवारी

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 29 एप्रिल 2020

  • ठाणे जिल्ह्यात एका दिवसांत 58 नवे रूग्ण
  • एका रुग्णाचा मृत्यू; एकूण बधितांचा आकडा 861 

ठाणे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी (ता. 29) एका दिवसात 58 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाणे शहरात 23, कल्याण –डोंबिवलीत 13, नवी मुंबईत 18, बदलापूर मध्ये 3 आणि ठाणे ग्रामीणमध्ये एका नवीन रुग्णाची नोंद झाली तर, एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 861 वर पोहोचला असून मृतांचा आकडा 22 वर गेला आहे.  

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वेगाने होत असून जास्त लोकसंख्येमुळे ही एक चिंतेची बाब झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व महापालिका प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
 ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बुधवारी ठाणे पालिकेच्या हद्दीत 23 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या 279 वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवलीत 13 नव्या रुग्णांमुळे एकूण संख्या 156 वर गेली. नवी मुंबई पालिका क्षेत्रात 18 नवीन रुग्ण आढळून आल्याने तेथील रुग्णांची संख्या 206 वर पोहोचली आहे. बदलापूरमध्ये 3 नव्या रुग्णांमुळे तेथील आकडा 25 वर पोहोचला आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला असून तेथील बाधितांचा आकडा 22 झाला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 58 new patients in one day in Thane district