पूर्ण शुल्क वसूल करणाऱ्या शाळांचे 7 वर्षाचे ऑडिट करा; बच्चू कडू यांचे आदेश

तेजस वाघमारे
Thursday, 10 September 2020

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुंबई विभागातील शाळांसदर्भातील समस्येबद्दल पालकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मुंबई : शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुंबई विभागातील शाळांसदर्भातील समस्येबद्दल पालकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरोना काळात पालक सध्या विविध समस्यांना तोंड देत आहेत. अनेक पालकांनी 200 मीटर अंतरावर स्कुल असेल तरी स्कुल बस फीची सक्ती करणे,परिक्षेस बसू न देणे. शुल्क बाबत पीडीसी चेकची सक्ती करणे अशा समस्या पालकांनी मांडल्या.

राज्यातील बड्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच; तुकाराम मुंढे यांची बदली रद्द

सीबीएससी, आयसीएसई बोर्डाच्या शाळा राज्य सरकारचे नियम लागू होत नाही म्हणून आमच्या तक्रारीकडे सरळ दुर्लक्ष करतात या स्वरुपाच्या बहुतांश तक्रारी पालकांनी केल्या. वाढीव फी विरोधात आंदोलन करणाऱ्या अनेक पालकांच्या मुलांच्या प्रवेश रद्द केल्यावर काही पालकांनी लक्ष वेधले. तर काही शाळा विविध खर्चाच्या  नावावर फी अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल करताहेत. काही शाळा प्रशासनाने  पूर्ण शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणदेखील नाकारल्याचे गाऱ्हाणे पालकांनी बच्चू कडू याच्याकडे मांडले.
बच्चू  कडू यांनी मुंबई  विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांना ज्यास्त फी घेणाऱ्या शाळांचे 7 वर्षाचे व्यवहाराचे ऑडीट करुन, संबधीत शाळा प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.त्याचबरोबर ज्या सुविधा शाळा देत नाही त्या  शाळांना शुल्क कपात करण्याचा प्रस्ताव देण्याचा आदेश दिले. 

मनसेचा सत्ताधारी शिवसनेला इशारा; अद्यापही ठाण्यात मालमत्ता करमाफी का नाही?

शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्याना परीक्षेपासून वंचित करु नका, ऑनलाईन वर्गाला बसू न देणाऱ्या शाळांना नोटीस पाठवा. एकाही विद्यार्थ्याला परीक्षेत पासून आणि ऑनलाईन  शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी उपसंचालकांनी घ्यावी अन्यथा उपसंचालकांवर कारवाई करेल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. प्रहार विद्यार्थी संघटना अध्यक्ष ऍड. मनोज टेकाडे , मुंबई संपर्क प्रमुख ऍड. अजय तापकीर यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला. पालक संघाचे अध्यक्ष जयंत  जैन, तुळस्कर, सुनील चौधरी बैठकीला उपस्थित होते.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 year audit of schools which collect full fees orders of Bachchu Kadu