मुंबईत गेल्या 24 तासात 726 नवे कोरोना रुग्ण; रुग्ण बरे होण्याचा दर 91 टक्क्यांवर

मिलिंद तांबे
Sunday, 15 November 2020

आज 726 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,69,130 झाली आहे. तर आज 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,555 वर पोचला आहे.

मुंबई : आज 726 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,69,130 झाली आहे. तर आज 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,555 वर पोचला आहे. आज 850 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,44,659 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 91 टक्के इतका झाला आहे.

कोविड सेंटर, रुग्णालयात डॉक्टर्स, रुग्णांची दिवाळी! कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 243 दिवसांवर गेला आहे. तर 12 नोव्हेंबर पर्यंत एकूण 16,79,888 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 7 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.29 इतका आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 16 मृत्यूंपैकी 11 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 12 पुरुष तर 4 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 8 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षा खाली होते. 8 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 7 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. 

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्येही; निर्देशांकांचा सर्वकालिक उच्चांक

मुंबईत 482 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,676 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 5,070 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 437 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

726 new corona patients in Mumbai in last 24 hours 

-------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 726 new corona patients in Mumbai in last 24 hours