महाड दुर्घटना! इमारत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू; पाच जणांवर गुन्हे दाखल; जाणून घ्या इमारतीविषयी सविस्तर माहिती

महाड दुर्घटना! इमारत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू; पाच जणांवर गुन्हे दाखल; जाणून घ्या इमारतीविषयी सविस्तर माहिती


महाड, - महाड शहरातील तारीक गार्डन या इमारतीच्या दुर्घटनेनंतर या ठिकाणी शोध कार्याला वेग आला असून आत्तापर्यंत आठ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे तर चार वर्षाचा एक मुलगा गुखरूप जिवंत काढण्यात आला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी  महाराष्ट्र पोलीस ठाण्यामध्ये  पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 महाड शहरातील काजळपूरा भागामध्ये असलेली तारीक गार्डन ही इमारत 2००9 साली बांधलेली होती .निकृष्ट बांधकामामुळे काल सायंकाळी सहा वाजता ही इमारत अचानक कोसळली. या इमारतीमध्ये 45 सदनिका असून इमारत कोसळली त्यावेळी 86 जण इमारतीमध्ये होते. परंतु इमारत कोसळत असल्याचे लक्षात येतात अनेक जण बाहेर पडले या धावपळीमध्ये बारा जण किरकोळ जखमी झाले आहेत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल रात्री पासूनच या ठिकाणी मदत कार्याला वेग आला आहे श्वानपथक ही मदतीला दाखल झाले आहे. ची टीम दहा पोकलेन व जेसीपी 25 हून अधिक डंपर तसेच सामाजिक संस्था व कार्यकर्ते या ठिकाणी मदत कार्य करत आहेत अनेक डंपर भरून द्वारे काढले जात आहेत.

आज सकाळी बांधकाम व्यवसायिक नावेद इसाने यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला हे मदत कार्य सुरू असतानाच मोहम्मद बांगी हा चार वर्षांचा मुलगा ढिगाऱ्याखाली सुखरूप असल्याने त्याला बाहेर काढून आनंद व्यक्त करण्यात आला यानंतरच्या मदत कार्यामध्ये आत्तापर्यंत आठ मृतदेह सापडले मरण आहेत. युद्ध पातळीवर ती मदत कार्य सुरू आहे जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार आ.भरत गोगावले ,माजी आमदार माणिक जगताप नगराध्यक्ष स्नेहल जगताप याठिकाणी दिवसभर थांबून आहेत. आरोग्य यंत्रणेच्या व खाजगी रुग्णवाहिका सज्ज आहेत .तर महाड औद्योगिक वसाहत महाड उत्पादक संघ यांच्या रुग्णवाहिका हे घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या. दिगाऱ्यातून काढण्यात आलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत होते.

दरम्यान. या दुर्घटना प्रकरणी तारीक गार्डन इमारतीचे विकासक फारुक महामुदमिया काझी (प्रोप्रा. कोहिनूर डेव्हलपर्स तळोजा नवी मुंबई ), वास्तूविशारद गौरव शहा ( व्हर्टीकल आर्कीटेक्ट ॲंन्ड कन्सल्टंसी नवी मुंबई ), आर सी सी डिझायनर्स बाहुबली टी धावणे ( श्रावणी कंन्सल्टन्सी मुंबई ) , महाड न. प. चे तत्कालीन कनिष्ठ पर्यवेक्षक शशिकांत दिघे , आणि तत्कालीन न प मुख्याधिकारी दिपक झुंजाड यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

इमारतीला परवानगी

या इमारतींची बांधकाम परवानगी नगरपरिषदेने  ११/५/२०११ रोजी दिलेली असून इमारत पुर्ण झाल्यानंतर इमारतींचा भोगवटा १९/१०/२०१३ रोजी देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली. भोगवटा प्रमाणपत्रावर तत्कालीन मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांची स्वाक्षरी असल्याचे तर शशिकांत दिघे हे बांधकाम पर्यवेक्षक म्हणून नगरपरिषदेत कार्यरत होते असेही मुख्याधिकारी पाटील यांनी स्पष्ठ केले 

निकृष्ट बांधकामाचा नमुना 
तारीक गार्डन इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रहिवासी संबधीत बिल्डरकडे करीत होते , मात्र नगरपरिषदेत तक्रारी करु नका मी दुरुस्ती करुन देतो अशी बोलवण या बिल्डरकडून केली जात होती , अशी माहिती या इमारतीमधील रहिवाशांनी दुर्घटनेनंतर दिली . दुर्घटना घडल्याच्या दिवशी सकाळी इमारतीच्या पार्कींगमधील एक पिलर ढासळल्याची तक्रार या इमारतीच्या रहिवाशांनी या बिल्डरच्या निदर्शनास आणून दिले , मात्र मी प्लास्टर करुन देतो, अशी रहिवाशांची समजूत काढून त्यांची पुन्हा बोळवण केली , आणि त्यानंतर केवळ सात आठ तासातच ही इमारत पुर्ण कोसळून ही दुर्घटना घडली .

मृतांची नावे
. नावेद झमाने - वय 3०
 नौसीन नदीम बांगी - वय 35 रा      वेस्वी, मंडणगड
आदीम - वय 14 रा कुंबळे
मतीन मुकादम - वय 17 रा महाड
फातिमा शौकत अलसुलकर - वय 58 
श्रीमती रोशनबी दाऊदखान देशमुख

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com