
डोंबिवली - क्लासला गेलेल्या 8 वर्षीय विद्यार्थिनींवर शिक्षिकेच्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेतील दावडी येथे घडली आहे. पिडीत मुलीने घरी जाऊन हा प्रकार आपल्या पालकांना सांगताच पालकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ 19 वर्षीय आरोपी वैभव सिंग याला अटक केली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी सिंग याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.