esakal | घर देतो सांगत बुकिंगच्या नावाखाली तिघांची 90 लाखाला फसवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

घर देतो सांगत बुकिंगच्या नावाखाली तिघांची 90 लाखाला फसवणूक 

संबधित आरोपीला उल्हासनगरात येथे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

घर देतो सांगत बुकिंगच्या नावाखाली तिघांची 90 लाखाला फसवणूक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : नामचीन बांधकाम कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं सांगत एका भामट्याने मुंबईमध्ये तीन जणांची तब्बल 90 लाख रुपयांची फसवणूक केली होती. यानंतर संबंधित आरोपी फरार असून त्याच्याविरुद्ध विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील बरेच दिवस पोलिसांपासून लपून असलेल्या या भामट्याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक करून विक्रोळी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे. 

2016 ते 2018 च्या दरम्यान मुंबईच्या पार्क साईट विक्रोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीतील फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली विजयसिंग या भामट्याने तीन इसमांकडून जवळपास 90 लाख 41 हजार रुपयांची रक्कम चेकद्वारे घेतली होती. मात्र, अनेक वर्षे उलटून गेली तरी त्या इसमांना घरे मिळाली नाहीत आणि आरोपी विजयसिंग फोनवर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला होता. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पैशांची गुंतवणूक करणाऱ्या या इसमांनी पार्क साईट, विक्रोळी पोलिस ठाण्यात विजय सिंग याच्याविरुध्द तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 

पैशांचा अपहार करून आरोपी विजयसिंग हा मुंबई व ठाण्यातील विविध ठिकाणी लपून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, काल दुपारी उल्हासनगरातील हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उसाटणे पोलिस चौकीजवळ असणाऱ्या निसर्ग हॉटेलमध्ये विजयसिंग येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक उदय पालांडे यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे, पोलिस निरीक्षक मनोहर पाटील, उदय पालांडे, पोलिस नाईक विश्‍वास माने, विठ्ठल पदमीरे, महेश पाटील, दादासाहेब भोसले, महिला पोलिस कॉन्स्टेबल माया तायडे यांनी सापळा रचून विजय सिंग याला ताब्यात घेतले. सध्या त्यांनी त्याला विक्रोळी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 
 

loading image
go to top