तीन दिवसांत मुख्यमंत्री सहायता निधीत 93 कोटी जमा! तुम्हीही मदत करू शकता

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 31 मार्च 2020

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे, असे उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन दिवसांत 93 कोटी 5 लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत.

मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे, असे उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन दिवसांत 93 कोटी 5 लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शिर्डी संस्थानाने 51 कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसाच्या वेतनपोटी 11 कोटी रुपये, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरने 1 कोटी याशिवाय इतरही व्यक्ती, संस्थांनी मदत केली आहे. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. 
कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने "मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19' हे स्वतंत्र बॅंक खाते स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये उघडले आहे. उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था तसेच या युद्धात सरकारसोबत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सर्व संस्था आणि नागरिकांनी या खात्यात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

खात्याची सविस्तर माहिती 
नाव : मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 
बचत खाते क्रमांक- 39239591720 
बॅंक : स्टेट बॅंक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई - 400023 
शाखा कोड : 00300 
आयएफएससी कोड : SBIN0000300 

- सदर देणग्यांना आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

93 crore deposited in Chief Minister's Assistance Fund in three days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 93 crore deposited in Chief Minister's Assistance Fund in three days