मुंबईत पालिकेकडून आणखी 990 वृक्षांची कत्तल; वृक्षप्राधिकरणाची लवकरच बैठक

समीर सुर्वे
Saturday, 12 September 2020

मुंबईत सार्वजनिक आणि खासगी विकास कामांसाठी तब्बल 990 झाडांचा बळी जाणार आहे.

मुंबई : मुंबईत सार्वजनिक आणि खासगी विकास कामांसाठी तब्बल 990 झाडांचा बळी जाणार आहे. याबाबत परवानगीसाठी आज पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची बैठक बोलविण्यात आली होती. मात्र, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे ही बैठक तहकुब करण्यात आली असून लवकरच पुन्हा बैठक होण्याची शक्‍यता आहे.

राज्यात हाॅटेल, रिसाॅर्टस् शंभर टक्के क्षमतेने सुरू; मार्गदर्शक सूचना आणि कार्यप्रणाली जारी

मुंबईतील विकासकामांमध्ये अडथळे ठरणारी 262 झाडे कापण्यासाठी आणि 728 झाडे पुनर्रोपित करण्याच्या परवानगीचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मांडण्यात आले आहे. यात, मेट्रोच्या 6 व्या टप्प्यासाठी 73 झाडे तोडण्याची आणि 307 झाडे पुनर्रोपित करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. तर, गोरेगाव येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही झाडांचा बळी जाणार आहे. के पश्‍चिम प्रभागातही रस्ता रुंदीकरणासाठी झाडे कापली जातील. याच बरोबर अनेक खासगी विकसकांचेही झाडे कापणे आणि पुनर्रोपित करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले आहे.

झाडांचा बळी जाऊ नये म्हणून महापालिकेकडून झाडे पुनर्रोपित करण्यावर भर दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात पुनर्रोपित केलेल्या झाडांचे आयुष्य फार काळ नसते. तसेच, पुनर्रोपित केलेली झाडे किती वर्ष जगली, याचीही माहिती पालिकेकडे उपलब्ध नसते. फक्त झाड पुनर्रोपित केले का नाही, याची पाहाणी केली जाते.

कंगनाच्या अडचणीत वाढ; ड्रग्जप्रकरणी गृहविभागाकडून मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश

सहा महिन्यांत केवळ प्राधिकरणाची बैठक!
लॉकडाऊनपासून महापालिकेतील एकाही समितीची बैठक झालेली नाही. ऑगस्ट महिन्यात अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी फक्त एकदाच महासभा झाली होती. तर, गटनेत्यांच्या बैठकीला आयुक्त इक्‍बाल सिंह व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून उपस्थित राहील्याने विरोधांकांनी सभात्याग केला होता. मात्र, आता वृक्ष प्राधिकरणाची बैठक बोलवल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 990 more trees felled by Mumbai Municipal Corporation