esakal | मोठी बातमी! परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Parambir Singh

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh यांच्या विरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मोठी बातमी! परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh यांच्या विरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक ही केली आहे. (A case has been registered against 8 persons including mumbai police Parambir Singh)

फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आरोपी व इतर सहकारी साथीदार व संबंधित पोलीस अधिकारी यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 299/ 21, कलम387,388,389,403,409,420,423,464,465,467,468,471,120 b),166,167,177,181,182,193,195,203,211,209,210,347,109,110,111,113 भा .द .वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. नमूद गुन्ह्यातील 2 आरोपी अटक करण्यात आले आहे.

हेही वाचा: पाणीच पाणी चहुकडे! टिटवाळा- कल्याणमध्ये पावसाचं थैमान

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, डीएसपी अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image