Dombivali Fire : डोंबिवलीतील इंडो अमायन्स कंपनी प्रशासनावर गुन्हा!

Thane News: हवालदार जयवंतराव भोसले यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवलीतील इंडो अमायन्स कंपनी प्रशासनावर गुन्हा!
Dombivali midc blast sakal

Dombivali Fire Blast : डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमायन्स कंपनीत बुधवारी सकाळी आग लागून दुर्घटना घडली होती. नागरी जीवितास धोका निर्माण करणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कंपनी प्रशासनावर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या निष्काळजीपणाला कंंपनी प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे.

कंंपनीत उत्पादन प्रक्रिया करताना सुरक्षे विषयी खबरदारी न बाळगणे, निष्काळजीपणे आणि हयगयीने वर्तन करून नागरी जीवितास धोका, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि धोका निर्माण करणे, असा ठपका ठेवत मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हवालदार जयवंतराव भोसले यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील फेज दोनमध्ये 12 जून रोजी सकाळी इंडो अमायन्स कंपनीत टु मिथाईल सायक्लोएक्झिल ॲसिटेट, बेलोरे नायट्रेट या रसायनांवर डेस्टिलेशनची प्रक्रिया करून त्या केमिकलचे प्युरीफिकेशन करून फाईन केमिकल करण्याची प्रक्रिया सुरू असताना रासायनिक प्रक्रिया होऊन स्फोट झाला व कंंपनीत आग लागली.

या आगीत इंडो अमायन्स कंपनीसह शेजारील मालदे कॅपिसीटर्स कंंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या उत्पादन प्रक्रिया करताना कंपनी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही खबरदाऱ्या घेतल्या नाहीत. अतिशय निष्काळजीपणे ही उत्पादन प्रक्रिया राबवली. तसेच, कंपनीतील कामगार, परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण केली.

डोंबिवलीतील इंडो अमायन्स कंपनी प्रशासनावर गुन्हा!
Dombivali Blast: डोंबिवली MIDC मधील त्या कंपन्या स्थलांतरीत होणार की नाही? प्रश्न चिघळला

या स्फोटात कंपनी परिसरातील रस्त्यावरील वाहने, झाडे जळून खाक झाली. आगीमध्ये कंपनीच्या मालमत्तेचे तसेच, जवळच असलेल्या मालदे कॅपिसीटर्सचे कंपनीचे नुकसान झाले आहे.

इंडो अमायन्स कंपनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाने हा प्रकार घडला असल्याचा ठपका ठेवत मानपाडा पोलिसांनी कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम चोपडे या प्रकरणाचा तपास करत आहे.

डोंबिवलीतील इंडो अमायन्स कंपनी प्रशासनावर गुन्हा!
Dombivali News : आईसोबत मुंबईला नातेवाईकांकडे जाताना मृत्यूने गाठले; 24 वर्षीय तरुणाचा ट्रेनमधून पडून मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com