Dombivli Crime Case : इंटरनेट दुरुस्तीच्या नावाखाली घरात घुसून वृद्धेची फसवणूक

Senior Citizen Fraud : इंटरनेट दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून 1 लाख 60 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. रामनगर पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
Dombivli Crime Case
Dombivli Crime Case sakal
Updated on

डोंबिवली : घरातील इंटरनेट दुरुस्तीसाठी आलो आहे असे सांगत घरात घुसून वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याकडिल 1 लाख 60 हजाराचा सोन्याचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. फसवणूक प्रकरणी वृद्ध महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com