esakal | 'माझं नाव सनी, मी घराबाहेर पडू का?' मुंबई पोलिस म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai police

'माझं नाव सनी, मी घराबाहेर पडू का?' मुंबई पोलिस म्हणाले...

sakal_logo
By
शर्वरी जोशी

मुंबई पोलिस त्यांच्या कर्तव्यदक्षतेसोबतच भन्नाट ट्विटमुळेही कायम चर्चेत असतात. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ते कायमच अफलातून कल्पना अमलात आणत असतात. सोबतच नागरिकांनी विचारलेल्या काही भन्नाट प्रश्नांची त्याच अंदाजात उत्तरही देत असतात. सध्या सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचं असंच एक ट्विट चर्चेत आलं आहे. सध्याच्या काळात मी घराबाहेर पडू शकतो का?, असा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी हटके उत्तर दिलं आहे. (a man asks if he can go out during lockdown mumbai police-response-is-epic-netizens-loved-it)

गेल्या वर्षभरापासून देशावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे या काळात अनेक ठिकाणी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. मुंबईतदेखील कडक बंदोबस्त पाळण्यात येत असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. यामध्येच एका व्यक्तीने ट्विट करुन 'मी घराबाहेर जाऊ का?, असा प्रश्न विचारला. त्यावर मुंबई पोलिसांनी अफलातून उत्तर दिलं आहे.

"सर माझं नाव सनी आहे. मी सुद्धा घराबाहेर जाऊ शकतो का?", असा प्रश्न एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना विचारला. त्यावर "सर, तुम्ही खरंच सौरमंडळातील तो एकमेव ग्रह असाल ज्याच्या अवतीभोवती पृथ्वी आणि अन्य ग्रह फिरत आहेत. तर तुम्हाला तुमच्या जबाबदारीची नक्कीच जाणीव असेल. कृपा कोरोनाच्या सानिध्यात येऊन कोणतीही तडजोड करु नका", असं भन्नाट उत्तर पोलिसांनी या नेटकऱ्याला दिलं आहे.

दरम्यान, सूर्य ज्या पद्धतीने बाहेर असतो तसंच माझं नाव सुद्धा सनी आहे त्यामुळे मी घराच्या बाहेर पडू का असा खट्याळ प्रश्न या नेटकऱ्याने विचारला होता. परंतु, पोलिसांनी त्याच्याच शैलीत त्याला भन्नाट उत्तर दिलं. विशेष म्हणजे पोलिसांचं हे ट्विट अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालं आहे. सोबतच अनेकांनी सनी नामक व्यक्तीला कोरोना गाईड लाइन्सची आठवणही करुन दिली आहे.