esakal | कोरोना विषाणूचा 'सी.१.२' हा नवा प्रकार दक्षिण आफ्रिकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कोरोना विषाणूचा 'सी.१.२' हा नवा प्रकार दक्षिण आफ्रिकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या (corona) संभाव्य तिसऱ्या लाटेची (Third Wave) शक्यता असताना अल्फा, डेल्टा आणि डेल्टा प्लस (Delta Plus) असे नवीन प्रकार समोर येत आहेत. त्यापाठोपाठ आता कोरोना (Corona) विषाणुचा 'सी. १. २' (C 1.2) प्रकार आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या या विषाणुची तीव्रता अधिक असून तो झपाट्याने पसरत आहे. सध्या भारतात (India) या विषाणूचा एकही रुग्ण नसला, तरीही सतर्क राहण्याचा सल्ला राज्य कोविड (Covid) टास्क फोर्सने (Task Force) दिला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबनल डिसिजेस (एनआयसीडी) आणि दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू-नॅटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेंसिंग प्लॅटफॉर्म (केआरआयएसपी) च्या शास्त्रज्ञांनी नुकताच एक अभ्यास केला. त्यांना मे महिन्यात पहिल्यांदा कोरोना विषाणूचा 'सी.१.२' हा नवा प्रकार दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. तेव्हापासून तो वेगाने इतर देशांमध्येही पसरला. सध्या चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझिलंड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडमधील कोरोना रुग्णांमध्ये हा प्रकार आढळला आहे.

हेही वाचा: मुंबईसह ठाणे,पालघर मध्ये मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात रुग्ण नाही

मुंबईसह महाराष्ट्रात आतापर्यंत डेल्टा आणि डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात 'सी.१.२' विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून तो राज्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषाणूची तीव्रता ही इतर प्रकाराच्या तुलनेत अधिक असल्याने आपण सतर्क राहिले पाहिजे, असे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

सध्या हा प्रकार दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. त्याचा मुंबईसह महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या प्रकारापैकी हा सर्वाधिक घातक आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी.

- डॉ. गौतम भन्साळी, सदस्य, कोविड टास्क फोर्स

loading image
go to top