

विरार : बालगीतात आपण नेहमीच बाहुलीच लगीन ऐकत आलो आहे. किंवा भातुकलीच्या खेळातील हि बाहुला बाहुलीचे लगीन ऐकले आहे. परंतु चक्क नटलेला वर बाहुला आणि आणि मस्त पैठणी नेसून दागदागिन्यांनी मढलेली वधु यांच्या लग्नाचा घाट वसई पूर्वेकडील चांदीप गावात घातला गेला होता. या लग्नाला वसई पासून मुंबई पर्यंतचे सतराशे साठ व्हराडी हि उपस्थित होते. चांदीप गावात ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या धुमधडाक्यात आमंत्रित मान्यवर पाहुण्यांच्या आणि साऱ्या गावाच्या नागरिकांच्या साक्षीने मंगळाष्टकांच्या मंत्र घोषित "आली लग्न घटिका म्हणत ब्राम्हणांनी लग्नाचा बार उडवला.या लग्नात आलेल्या पाहुण्यांना बुंदीचे लाडू,तिळगुळ,केळ्याचे वडे देण्यात आले तरं महिलांना हळदीकुंकवा निमित्ताने वहाण म्हणून वस्तू भेट देण्यात आल्या.