
किन्हवली : शहापूर तालुक्यातील लवले येथील अल्पभूधारक कुटुंबातील एका युवकाचे सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न साकार झाले असून अग्नीवीर म्हणून नेमणूक झालेल्या या युवकाचे येथील गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. उत्तरप्रदेश राज्यातील बरेलीमध्ये नेमणूक झालेला हा सैनिक देशसेवा करण्यासाठी लवकरच कर्तव्यावर रुजू होणार आहे.