
Eknath Shinde: मान्सूनच्या पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाल्याचं बघायला मिळालं. रस्ते जलमय झाले, मेट्रो स्थानकात पाणी शिरलं तर लोकलसेवा ठप्प झाली. हिंदमाता परिसरात पाणी साचल्याने आदित्य ठाकरेंनी भाजप सरकावर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीकास्र सोडलं. शिंदेंना उद्देशतून ते म्हणाले की, त्यांनी केवळ खिशातले खड्डे भरुन काढले. त्या पैशातून ते फोडाफोडीचं राजकारण करीत आहेत.