esakal | उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

"आज मी बाळासाहेब ठाकरे यांना मिस करतेय, आज बाळासाहेब असायला हवे होते, असं फार वाटतंय", अशी भावना उर्मिला मातोंडकर यांनी बोलून दाखवली.

उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणापासून काही काळ अलिप्त राहिलेल्या उर्मिला मातोंडकर राजकारणात पुन्हा सक्रिय होताना पाहायला मिळतील. कारण उर्मिला यांनी आज शिवसेनेत अधिकृतरीत्या पक्षप्रवेश केला आहे. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधलं.

उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षाला बळकटी देणारा ठरेल असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. उर्मिला यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यवसन मंत्री आदित्य ठाकरे उर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाची बातमी : उर्मिला मातोंडकर रिटर्न्स ! शिवसेनेत अधिकृत प्रवेश करत उर्मिला होणार राजकारणात पुन्हा सक्रिय

दरम्यान, पक्षप्रवेशावेळी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. "आज मी बाळासाहेब ठाकरे यांना मिस करतेय, आज बाळासाहेब असायला हवे होते, असं फार वाटतंय, अशी भावना उर्मिला मातोंडकर यांनी बोलून दाखवली.

आदित्य ठाकरे म्हणतात...

उर्मिला मातोंडकर यांच्या पक्षप्रवेशामुळे आपल्याला अत्यंत आनंद झालाय अशी भावना उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली. महाराष्ट्रासाठी उर्मिला मातोंडकर चांगलं काम करतील असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी अत्यंत मोजक्या शब्दात उर्मिला यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

aaditya thackerays first reaction after urmila matondkar joined shivsena party

loading image