राज्यघटना जाळणाऱ्यांचा आपकडून निषेध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मुंबादेवी : सरकारने मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे; तसेच दिल्लीत भारताची राज्यघटना जाळणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज येथे केली. गणेशोत्सवानंतर आप धडाक्‍यात राज्यभर पोहोचेल. जिल्हा, तालुका आणि स्थानिक बूथ स्तरावर कार्यकर्ते, पदाधिकारी नियुक्त करीत आहोत. 

लवकरच आपच्या सदस्यता नोंदणीस सुरुवात केली जाईल, असेही सावंत यांनी सांगितले. महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त लोककल्याणकारी सरकार आणणे, हा आपचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही आमच्या समविचारी पक्षांशी संपर्क साधत आहोत. आम्ही महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवू. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार फसवे आणि धोकेबाज आहे, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा "आप' हाच पर्याय होऊ शकतो. महाराष्ट्राला उत्तम सरकार देण्यासाठी ग्रामीण भागापासून आम्ही सुरुवात करतोय, असेही ते म्हणाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aap protest against Insult of constitution