#AareyKillerDevendra : नेटिझन्स म्हणतात, 'आरे किलर देवेंद्र'; ट्विटरवर ट्रेंड

टीम ई-सकाळ
Monday, 7 October 2019

मुंबई : आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून पर्यावरणवादी संपात व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांनी या वृक्षतोडीला विरोध केला होता. पण, राज्य सरकार आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यावर ठाम राहिल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरणवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

मुंबई : आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून पर्यावरणवादी संपात व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांनी या वृक्षतोडीला विरोध केला होता. पण, राज्य सरकार आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यावर ठाम राहिल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरणवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

देवेंद्र फडणवीसच लक्ष्य
मुंबई हायकोर्टात वृक्षतोडीविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पण, कोर्टाने त्या याचिका फेटाळल्यानंतर कार शेड उभारणीसाठी सरकारला रान मोकळे झाले आणि दोन दिवसांत कॉलनीतील 2400 झाडांवर कुऱ्हाड पडली. या वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात आली. 'झाडे तोडणाऱ्यांना बघून घेऊ', असे म्हणत शिवसेनेने यातून सोयिस्करपणे अंग काढून घेतले आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस सगळ्यांच्या निशाण्यावर आले. काल, पासून ट्विटरवर #AareyKillerDevendra असा हॅशटॅग सुरू झाला आहे. आरेतील वृक्षतोडीच्या बदल्यात 20 हजार झाडे लावून भरपाई करू, असे राज्य सरकारने म्हटले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनाही आरेच्या मुद्द्यावरून ट्रोल करण्यात आलं. त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे काही मिम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसत होतो.

निवडणुकीवर परिणाम होणार?
ऐन विधानसभा निवडणुकीत आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेटचा विषय चर्चेला आला. आता याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत मतदानावर दिसणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरेतील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून घूमजाव केल्यामुळे मुंबईतील काही टक्का शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर नाराज आहे. तर, दुसरीकडे या सगळ्याला भाजप आणि विशेषतः मुख्यमंत्री जबाबदार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आता हा मुद्दा मतदानाच्या दिवसापर्यंत चर्चेत राहील आणि त्याचा परिणाम सरकार विरोधात मतदानावर होईल का? याविषयी उत्सुकता आहे.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aarey forest Aarey Killer Devendra hashtag on twitter Devendra fadnavis