आरे शिवसेनेमुळे नाही, तर मुंबईकरांमुळे वाचलं; अमित ठाकरेंची टीका

आरे शिवसेनेमुळे नाही, तर मुंबईकरांमुळे वाचलं; अमित ठाकरेंची टीका

मुंबई: मनसे कार्यकर्ते (MNS) उद्या राज्यभरातील चाळीस समुद्र किनाऱ्यांवर साफसफाईची मोहिम राबवणार आहेत. या सगळ्या मोहिमेचं नेतृत्व अमित ठाकरे करणार आहेत. सरकार आणि महापालिकेकडे इच्छाशक्तीच नाहीये. ही इच्छाशक्ती जर असती तर ही वेळ आलीच नसती, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर (ShivSena) केली आहे. आरेचं जंगल हे शिवसेनेमुळे नाही तर मुंबईकर (Mumbai Citizen) जनतेमुळे वाचलं असल्याचा ठाम दावा देखील त्यांनी केला आहे. त्यांनी म्हटलंय की, त्यांनी गेल्या 25 वर्षांत काम केलं असतं तर आम्हाला याप्रकारे समुद्रकिनारे साफ करायची वेळ आलीच नसती.

आरे शिवसेनेमुळे नाही, तर मुंबईकरांमुळे वाचलं; अमित ठाकरेंची टीका
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पोलिसांवर हल्ला; दोन कर्मचारी शहीद

या स्वच्छता मोहिमेबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, समुद्र किनारे भकास आणि घाण झाल्याचं चित्र आहेत. त्यामुळे हे समुद्र किनारे साफ करण्याची संकल्पना आम्हा मनसे कार्यकर्त्यांना सुचली. महाराष्ट्राच्या 720 किमीच्या समुद्र किनाऱ्यावरील चाळीस समुद्र किनाऱ्यांवर साफसफाई करण्याची ही मोहिम आम्ही आखली आहे.

ज्यांचं हे काम आहे त्यांच्याकडून हे काम होत नाहीये. यासाठी इच्छाशक्ती लागते. ही इच्छाशक्ती सरकारकडे आणि महानगरपालिका ज्यांच्याकडे गेली 25 वर्षे आहे त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे या गोष्टी झालेल्या नाहीयेत. पर्यटनाबाबत यांच्याकडून काहीच होणार नाहीये कारण यांची इच्छाशक्तीच नाहीये. मुळात हे साफ ठेवायचीच त्यांची इच्छाशक्ती नाहीये, तर त्याचा विकास कसा होईल? मनसे हा पहिला पक्ष आहे ज्याने ही मोहिम राबवली आहे.

आरे शिवसेनेमुळे नाही, तर मुंबईकरांमुळे वाचलं; अमित ठाकरेंची टीका
59 देशांत 2936 रुग्ण; Omicron Variant संदर्भात आरोग्य मंत्रालयाची माहिती

तुम्ही शिवसेनेच्या संकल्पनेला कॉपी करताय, अशी टीका झाली, त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, हे सगळे किनारे आपले आहेत. त्यामुळे हा विचार आम्ही केला तर तो चुकीचा ठरत नाही. तुम्ही महापालिकेद्वारे गेल्या 25 वर्षांत यंत्रणा नीट राबवली असती तर ही वेळ आलीच नसती. आरे हे लोकांमुळे वाचलेलं आहे, लोक रस्त्यावर उतरल्यामुळे आरे वाचलंय, असंही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com