म्हाडाच्या रहिवाशांना दिलासा, संपूर्ण थकीत भाडे भरल्यास मिळणार 'ही' सवलत

म्हाडाच्या रहिवाशांना दिलासा, संपूर्ण थकीत भाडे भरल्यास मिळणार 'ही' सवलत

मुंबई:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील 21 हजार 149 संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरू, रहिवाशांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे.  याअंतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरू, रहिवाशांनी संपूर्ण थकीत भाडे विहित मुदतीत भरल्यास निव्वळ व्याजावर सवलत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी बुधवारी दिली. 

योजना दोन टप्प्यांत आणि फेब्रुवारी- 2021 आणि मार्च -2021 या दोन महिन्यांमध्ये लागू राहणार आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यातील भाडेकरू, रहिवासी यांनी 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत संपूर्ण थकीत भाडेरकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजामध्ये 60 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यांतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यातील भाडेकरू, रहिवाशांनी 31 मार्च, 2021 पर्यंत संपूर्ण थकीत भाडेरकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजामध्ये 40 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ही योजना जाहीर केल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. या वेळी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे उपस्थित होते.


129 कोटी रुपये थकीत

मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिर गाळ्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू, रहिवाशांकडे मोठ्या प्रमाणात भाडे आणि त्यावरील व्याजापोटी एकूण 129.92 कोटी रुपये थकीत आहेत. या योजनेंतर्गत जे भाडेकरू रहिवासी संपूर्ण थकीत रक्कम भरतील, त्यांनाच ही सवलत लागू राहील.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Abhay Yojana announced MHADA Mumbai Building Repair and Reconstruction Board

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com