उल्हासनगर - जवळपास सव्वाशे कोटी रुपयांचे वसुलीचे लक्ष समोर ठेवून उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी करबुडव्यांसाठी मालमत्ता कर विभागाच्या वतीने अभययोजना जाहीर केली आहे.
24 फेब्रुवारी पासून तीन टप्यात ही योजना सुरू राहणार असून करबुडव्यांसाठी ही शेवटची संधी आहे. त्यानंतर त्यांची संपत्ती जप्त करण्याची आणि लिलावाची, आणि दारात बँडबाजा वाजवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
आतापर्यंत मालमत्ता कराची 73 कोटी 51 लाख रुपयांच्या वर वसुली झालेली आहे.वसुलीचे 125 कोटीचे लक्ष समोर असल्याने आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त आयुक्त किशोर गवस,सहायक आयुक्त अजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारक व संकलक निलम कदम यांच्या टीमने 128 घरांचे पाणी कनेक्शन कट केले आहे. 3125 घरांना वॉरंट बजावण्यात आले असून 48 जप्तीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.त्याचे पडसाद उमटले असून त्यामुळे वसुलीला वेग मिळू लागला आहे.
आता वसुलीला गती मिळण्यासाठी अभययोजनेचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुषंगाने 24 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत थकबाकीची एकत्रित रक्कम भरल्यास त्यावर 100 टक्के विलंब शास्ती माफ केली जाणार आहे. 7 मार्च ते 12 पर्यंत एकत्रित रकमेचा भरणा केल्यास 75 टक्के विलंब शास्ती माफ करण्यात येणार असून १३ मार्च ते १८ मार्च पर्यंत थकबाकी भरल्यास 50 टक्के विलंब शास्ती माफ होणार आहे.
थकबाकीदार करबुडवे यांच्यासाठी 18 मार्च पर्यंतची शेवटची संधी आहे. त्यानंतर आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, सहायक आयुक्त अजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपत्ती जप्तीची, नळाचे कनेक्शन कट करण्याची आणि वसुलीसाठी करबुडव्यांच्या दारात बँड बाजा वाजवण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती कर निर्धारक व संकलक निलम कदम यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.