
मुंबई : जगभरातील विविध संस्था अन् प्रशासनामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा माजी विद्यार्थ्यांना शनिवारी (ता. ७) झालेल्या एका सोहळ्यात वालचंद गौरव पुरस्कार २०२४ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यात प्रामुख्याने ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक-अध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह सहा जणांचा समावेश होता.