esakal | गर्भपातावरील औषधांची अवैध विक्री, राज्यात एकूण 14 गुन्हे दाखल!
sakal

बोलून बातमी शोधा

tablets

गर्भपातावरील औषधांची अवैध विक्री, राज्यात एकूण 14 गुन्हे दाखल!

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : गर्भपातावरील औषधाची अवैध विक्री करणाऱ्या ( Patents ) विक्रेते तसेच दुकांदारांवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गर्भपातासाठी (Abortion) वापरण्यात येणाऱ्या औषधांचा गैरवापर (Patent Misuse) होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधांची खरेदी-विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयांच्या (Hospitals) अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर दिनांक 26 जुन 2021 ते 9 जुलै 2021 या कालावधीत अचानक तपासणी व धाडीची धडक मोहिम राबविली आणि एकूण 384 संस्थांची तपासणी केली. ( Abortion patents misuse fourteen cases filed against illegal saling-nss91)

सदर तपासणीमध्ये काही किरकोळ विक्रेते गर्भपातासाठी लागणारी औषधे अवैधरित्या प्राप्त करून घेत असल्याचे, तसेच काही विक्रेते चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुषंगे बनावट ग्राहक पाठवून संबंधीत किरकोळ विक्रेत्यांना अवैधरित्या प्राप्त केलेले व चढया दराने बिना प्रिस्क्रीप्शनने बिना बिलाने गर्भपाताची औषधे विकताना रंगेहाथ पकडण्यात आले व त्यांच्याकडून एकूण रु.47378।रुपये किंमतीची औषधे जप्त करण्यात आलेली आहेत.

हेही वाचा: शिक्षकांना खुशखबर , सप्टेंबर महिन्यात होणार 'TET' परीक्षा

सदर विक्रेत्यांविरुध्द पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली. अशा प्रकारच्या एकूण 13 किरकोळ विक्रेत्यांविरुध्द राज्यभरातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या विभागांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुंबईमधील एका पश्चिम उपनगरातील हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुध्द त्यांनी गर्भपातासाठी वापरलेल्या औषधांची माहिती न दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नोंदविण्यात आलेल्या 14 गुन्हयांमध्ये आतापर्यंत एकूण 11 व्यक्तींना अटक केली असून पोलिसांच्यावतीने पुढील कारवाई घेण्यात येत आहे. ज्या किरकोळ व ठोक औषध विक्रेत्यांच्या तपासण्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, अशा 42 विक्रेत्यांचेविरुध्द कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून प्रशासनाकडून पुढील कारवाई घेण्यात येत आहे.

या प्रकरणी प्रशासनाच्यावतीने सर्व औषध विक्रेत्यांना सुचित करण्यात येते की, गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची परवानाधारक संस्थेकडून खरेदी करून तज्ञ डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच औषध विक्री करण्यात यावी. तसेच जनतेने गर्भपातासाठी लागणारी औषधे अवैधमार्गाने प्राप्त करून घेण्याऐवजी, तज्ञ डॉक्टरांच्या सल्यानेच उपचार करून घ्यावेत, असे आवाहन अण्णा व औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग यांनी केले आहे.

loading image