धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 200 भटक्या कुत्र्यांचा मृ्त्यू

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 4 May 2020

सुमारे दोनशे भटक्क्या कुत्र्यांचे लॉकडाऊन कालावधीत मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे परिसरात निधन झाले असल्याचे सांगितले जात आहे. भटक्या कुत्र्यांना आता खायलाच मिळत नाही, त्यामुळे त्यांचे हाल होत असल्याचा अहवाल स्वयंसेवी संस्थेने तयार केला आहे.

मुंबई ः सुमारे दोनशे भटक्या कुत्र्यांचे लॉकडाऊन कालावधीत मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे परिसरात निधन झाले असल्याचे सांगितले जात आहे. भटक्या कुत्र्यांना आता खायलाच मिळत नाही, त्यामुळे त्यांचे हाल होत असल्याचा अहवाल स्वयंसेवी संस्थेने तयार केला आहे.

अन्नासाठी भटक्या कुत्र्यातील भांडणेही वाढली आहे. यामुळे नऊ कुत्र्यांचे अंधेरी एमआयडीसी परिसरात निधन झाले, असे सांगण्यात आले. केवळ कुत्रेच नव्हेत तर मांजरी, माकडे, पक्षी, भटक्या गाई म्हशी यांच्याही अन्नाची वानवा झाली आहे. रस्त्यावरील प्राण्यांना बुजुर्ग जास्त खायला देत असत, तेच घरात अडकले आहेत. त्याचबरोबर अनेक हॉटेल बंद आहेत, त्यामुळे त्यांच्या खाण्याचा प्रश्न झाला आहे. 
लॉकडाऊनमुळे अनेकांना उत्पन्नच नाही, त्यांच्याच खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत ते रस्त्यावरील प्राण्यांना काय खायला देणार अशी विचारणा होत आहे. कुत्रे तसेच मांजरी भुकेमुळे गेल्याचा आरे मिल्क कॉलनी आणि फिल्मसिटीत समजले असल्याचे सांगण्यात आले. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोहीत शर्मा, फराह खानसारख्या काही सेलीब्रिटींनी मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मदत दिली आहे. त्यामुळे काही संस्था त्यांची खाण्याची व्यवस्था करीत आहेत. हे प्राणीही आपल्या समाजाचा भाग आहेत. त्यांना जगवणे आपले काम आहे, असे या स्वयंसेवी संस्थांनी सांगितले. रात्रीच्या भोजनानंतर उरलेले अन्न आपण वर्तमानपत्रात गुंडाळून रस्त्याच्या कडेला ठेवले तर कुत्रे, मांजरी तसेच अन्य प्राणी ते खाऊ शकतील आणि अन्नही फुकट जाणार नाही असे आवाहनही स्वयंसेवी संस्थांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About 200 stray dogs died during the lockdown in Mumbai, Navi Mumbai and Thane area