नवी मुंबईत उड्डाणपुलांखालील जागांचा गैरवापर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

उड्डाणपुलांखालील जागांचा गैरवापर न करता, त्या मोकळ्या ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत; मात्र असे असतानाही नवी मुंबईतील अनेक उड्डाणपुलांखालील जागांचा बेकायदा वापर सुरू असल्याचे दिसून आहे; परंतु याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

नवी मुंबई : उड्डाणपुलांखालील जागांचा गैरवापर न करता, त्या मोकळ्या ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत; मात्र असे असतानाही नवी मुंबईतील अनेक उड्डाणपुलांखालील जागांचा बेकायदा वापर सुरू असल्याचे दिसून आहे; परंतु याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

नवी मुंबईतून जाणारा शीव-पनवेल महामार्ग तसेच ठाणे-बेलापूर महामार्गावर अनेक उड्डाणपूल आहेत. या उड्डाणपुलांखालील जागेचा सर्रासपणे गैरवापर केला जात आहे. उरण फाटा ते पालिका मुख्यालयाकडे जाणाऱ्या आम्रमार्गावर असलेल्या उड्डाणपुलाचा बेकायदा वापर सुरू असून, या ठिकाणी बिनदिक्कत भंगारची दुकाने, झोपड्या तसेच बेकायदा वाहने उभी केली जात आहेत. सानपाडा रेल्वेस्थानकाबाहेरील महामार्गावरील उड्डाणपूल हे भिकाऱ्यांचे व गर्दुल्ल्यांचे आश्रयस्थान बनले आहे. तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपुलांखाली बेकायदा पार्किंग केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या परिसरातून महिला व पादचाऱ्यांना जाणे जिकिरीचे व भीतीचे ठरते.

आम्रमार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाखाली असलेल्या बेकायदा झोपड्या तसेच भंगाराची दुकाने व बेकायदा पार्क केलेल्या वाहनांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
- शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी, बेलापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abuse of places under flyover in Navi Mumbai