केईएममध्ये BCG चाचणीला वेग,  कोविड 19 साठी ठरणार उपयुक्त

भाग्यश्री भुवड
Sunday, 4 October 2020

कोणतीही लस उपलब्ध नसल्याने काही ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस देण्याचा प्रयोग केईएम रुग्णालयात केला जात आहे. त्यानुसार, आतापर्यंत 48 ज्येष्ठ नागरिकांना या लसीचा डोस देण्यात आला आहे.

मुंबई: कोविड 19 हा आजार जगभर पसरत असताना धोका अधिक वाढत आहे. सार्स कोविड 2 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरोना विषाणूमुळे हा आजार होतो. ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेही, उच्च रक्तदाब तसंच इतर जुनाट आजार असणाऱ्या व्यक्तींना या आजाराचा संसर्ग लगेच होतो. त्यामुळे या वर्गाला धोका अधिक आहे. अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने काही ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस देण्याचा प्रयोग केईएम रुग्णालयात केला जात आहे. त्यानुसार, आतापर्यंत 48 ज्येष्ठ नागरिकांना या लसीचा डोस देण्यात आला असल्याचे केईएम रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे. 

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन मंडळाच्या केईएम हॉस्पिटल आणि मेडिकल रुग्णालयात ही लस दिली जात आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली आहे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे काम सध्या सुरू आहे. 

कोरोना विरोधात शरीरात रोगप्रतिकार शक्ती तयार करण्यासाठी बीसीजी लसीकरणाचा प्रयोग महापालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरु झाला असून आता पर्यंत 48 ज्येष्ठ नागरिकांना याचे लसीकरण करण्यात आले आहे. ही लस छातीतील संसर्ग प्रतिबंधित करत असून कोरोना छातीतील संसर्ग असल्याने ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यासाठी कितपत फायदेशीर होईल याची चाचणी केली जात आहे.

मुंबईतल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
केईएम रुग्णालयात बीसीजी लसीच्या प्रयोगाला एका महिन्यांपूर्वी सुरुवात झाली असून पुढचे चार महिने हा प्रयोग सुरू राहणार असल्याचे डॉ हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केले. आता पर्यंत 48 जणांना बीसीजी लस देण्यात आली आहे. या प्रयोगाचा कालावधी सहा महिन्याचा राहणार आहे. 60 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येत आहे. लस देण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला कोणताही गंभीर आजार असू नये अशी अट ठेवण्यात आली आहे. 

अधिक वाचाः  नेस्को कोविड सेंटरमधील अस्थायी कर्मचारी गेले 3 महिने वेतन विना

कोव्हिशील्ड वॅक्सीन ट्रायल प्रमाणेच ही बीसीजी वॅक्सीन ट्रायल आहे. वॅक्सीन दिल्यावर दर आठवड्याला टेलिफोन वरून दोन महिने सतत फॉलो अप घेतला जातो. फोलो अप झाल्यावर दोन आणि सहा महिन्यानंतर रक्त तपासणी केली जाते. बीसीजी चाचणी छातीतील कोणत्याही संसर्गावर काय परिणाम करते हे तपासले जाते. बीसीजी वॅक्सीन हे कमी शक्तीची असून शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवते.

अजून कुठे प्रयोग?

इतर सहा ठिकाणी हा प्रयोग सुरु असून मुंबई सह चेन्नई, दिल्ली, जोधपूर, भोपाळ आणि अहमदाबाद या ठिकाणी सुरु आहे. 

बीसीजी चाचणीसाठी अट
कर्करोग नसावा 
मूत्रपिंड , यकृत प्रत्यारोपण झालेले नसावे 
क्षयरोग नसावा 
एचआयव्ही संसर्ग नसावा 
आर्टी निगेटिव्ह 
आयजीजजी अँटीबॉडी निगेटिव्ह असावी 
छातीचा एक्सरे ही नॉर्मल असावा. 

बीसीजी वॅक्सिन ही लहाणपणी सर्वांनाच दिली जाते. त्यामुळे, ज्यांनी बीसीजीची लस घेतली आहे त्यांच्यासाठी कोविड 19 हा गंभीर आजार बनत नाही असा अभ्यास आम्ही केला आहे. शिवाय, भारतात बीसीजी दिली जाते. पाश्चिमात्य देशात ही वॅक्सिन दिली जात नाही म्हणून तिथे जास्त प्रमाणात मृत्यू दर आहे. 

डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Accelerate BCG testing in KEM Vaccination of 48 senior citizens


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accelerate BCG testing in KEM Vaccination of 48 senior citizens