एकीकडे कोरोना अन् दुसरीकडे ठाण्यातील अपघात सत्र, पोलिसही वैतागले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

कोरोनाचे संकट थोपविण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू केला असल्याने वाहनांची वर्दळ नाही. तरीही, मागील चार दिवसात ठाण्यात विविध ठिकाणी पाच अपघात घडल्याने मुंबई लगतचे हे शहर अपघातांचे 'ठाणे' बनले आहे.

ठाणे : कोरोनाचे संकट थोपविण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू केला असल्याने वाहनांची वर्दळ नाही. तरीही, मागील चार दिवसात ठाण्यात विविध ठिकाणी पाच अपघात घडल्याने मुंबई लगतचे हे शहर अपघातांचे 'ठाणे' बनले आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांनाही या अपघातांमुळे डोक्याला ताप वाढला आहे.

मोठी बातमीरायगडमध्ये सामुदायिक नमाज पठणाला बंदी

18 ते 21 एप्रिल या चार दिवसात पाच वाहनांचे अपघात घडले असून जीवितहानी टळली आहे. 18 एप्रिल रोजी दुपारी घोडबंदर परिसरातील तुळशीधाम नजीक भरधाव रिक्षा उभ्या टेम्पोला धडकून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. 19 एप्रिल रोजी पहाटे घोडबंदर रोडवरील गायमुख चौपाटीसमोर न्हावाशेवावरून गुजरातच्या दिशेने निघालेला रसायनांचे ड्रम वाहून नेणारा कंटेनर उलटला. तर, रात्रीच्या सुमारास सूरतहुन तळेगाव, पुणे येथे निघालेला अवजड स्टील कॉईल वाहून नेणारा कंटेनर गायमुख चौपाटीवरच उलटला. तर 21 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मुंब्रा बायपासवर भाजीपाला वाहून नेणारा ट्रक अन्य एका ट्रकला पाठीमागून धडकला. यात भाजीपाल्याच्या ट्रकचा चालक जायबंदी झाला. तर, मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास ठाण्याच्या दिशेने येणारा स्टील कॉईल वाहून नेणारा अवजड ट्रेलर घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्या नजिक उलटल्याची दुर्घटना घडली.

नक्की वाचाघरातच सलून अन् हातात कात्री, लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घरीच कापले केस

अवजड वाहनांचा वेग वाढला
ठाण्यातुन पुर्वदुतगती महामार्ग, मुंबई- नाशिक महामार्गासह घोडबंदर रोड, मुंब्रा बायपाससारखे अनेक महत्वाचे मार्ग जातात. इतरवेळी या रस्त्यांवर वाहनांची नेहमीच वर्दळ आणि वाहतुक कोंडी होत असते. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या या रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे, अनेक अवजड वाहने भरधाव वेगात बेदरकारपणे हाकली जात आहेत. परिणामी, अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

 

Accident continues in Thane Five accidents in four days, even during lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident continues in Thane Five accidents in four days, even during lockdown