मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये भरधाव कारने चिरडले; चौघांचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 31 August 2020

क्रॉफर्ड मार्केटमध्ये भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने  चौघांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.

मुंबई: क्रॉफर्ड मार्केटमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून चौघेजण जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने कार अंगावरून गेली होती. यामधील जखमींवर उपचार सुरु आहेत.शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या क्रॉफर्ड मार्केट येथील जनता रेस्टोरेंट जवळ आज 9 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात फूटपाथवरील लोक चिरडले गेले. यातील जखमींना जेजे रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, इस्टीम (VX, MH 02 AN 5325) कारचा रात्री 9 च्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने फुटपाथवर असलेल्या लोकांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातात जुबेदा रहेमान (70), सरोजा नायडू(69) , सायरा बानू (55)  आणि नईम यांचा मृत्यू झाला असून जखमी असलेल्या चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. मोहम्मद  जुही (32 वर्षे), नदीम अंसारी (40 वर्षे), कमलेश (20 वर्षे) मोहम्मद हनीफ (41 वर्षे) अशी जखमींचे नावे आहेत. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून, अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident at Crawford Market in Mumbai