नवी मुंबईजवळ शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

नवी मुंबईजवळ तुर्भे येथे शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला. राज ठाकरे हे दुसऱ्या गाडीत होते. लोणावळा एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते मुंबईला परतत होते. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. 

नवी मुंबई : लोणावळा येथून एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईजवळ तुर्भे येथे शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला. राज ठाकरे हे दुसऱ्या गाडीत होते. लोणावळा एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते मुंबईला परतत होते. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. 

राज ठाकरे पत्नी आणि संपूर्ण परिवारासह आज त्यांनी एकविरा गडावर देवीचे दर्शन घेतले. विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेत विजयासाठी साकडे घातले. एकविरा देवी हे ठाकरे कुटुंबाची कुलदैवत असल्याने कोणत्याही शुभ कामाच्या आधी ठाकरे कुटुंब नेहमीच देवीचे दर्शन घेतात. आज सकाळच्या सुमारास मुंबईहुन ते एकविरा गडावर पोहचले आणि सहपरिवारासह दर्शन घेतले. त्यानंतर ते परतत असताना हा अपघात घडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident on Sharmila Thackeray car near New Mumbai