
उल्हासनगर : अकस्मात मृत्यूचे खुनात रूपांतर; दोघांवर गुन्हा, एकाला अटक
उल्हासनगर : धूलिवंदनाच्या दिवशी शहरात एका व्यक्तीचा रस्त्यावर पडून झालेला मृत्यू अकस्मात (Accidental death) नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्या व्यक्तीचा खून करण्यात आल्याचा उलगडा उल्हासनगर ठाण्याच्या पोलिसांनी (ulhasnagar police) केला आहे. त्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद आता (Murder crime) खुनात झाली आहे. याप्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल (police fir filed) झाला असून (culprit arrested) एकाला अटक करण्यात आली.
हेही वाचा: लॉकडाऊनकाळात 36 टक्के नागरिक कर्जबाजारी; आर्थिक सर्वेक्षण अहवालात माहिती
कुंदनमल सुनगत (वय ४१) हे धूलिवंदनाच्या दिवशी दुपारच्या सुमारास धोबीघाट परिसरातून घरी निघाले होते. रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. लोखंडी पाईपावरून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे कुंदनमलचा भाऊ राजू याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली; मात्र कुंदनमल याला दोन व्यक्तींनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साक्षीदाराची फिर्याद घेतली. त्यात रूपराज ऊर्फ भाई राजा पाटील आणि निशान ऊर्फ बाळा हिरामण साठे यांनी कुंदनमल याला मारहाण करून मारल्याचे समोर आले.
उल्हासनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून २४ तासांत रूपराज ऊर्फ भाई राजा पाटील याला अटक केली. निशान ऊर्फ बाळा साठे हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत; मात्र खून नेमका कोणत्या कारणावरून झाला, याचा तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी दिली.
Web Title: Accidental Death Converted Into Murder Crime Asper Police Investigation Report Culprit Arrested Ulhasnagar Crime Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..