'वर्क फ्रॉम होम' मुळे मुंबईकरांत राग, तणाव वाढला

tress.
tress.

मुंबई : कोविड-19 महामारीमुळे फक्त उद्योगधंद्यांनाच खीळ बसली असे नव्हे तर आपल्या सर्वांच्या वस्तू वापराच्या पद्धती आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीवरही याचा परिणाम झाला आहे. या विषाणूने आपल्याला घरून काम करायला भाग पाडले आहे. तसेच ऑनलाईन असणे आता अपरिहार्य बनले आहे. साहजिकच सगळ्यांचाच स्क्रीनसमोर घालवला जाणारा वेळ लक्षणीय प्रमाणात वाढला आहे.

शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होऊ लागला आहे. इतक्या वर्षांचे ठरलेले दिनक्रम अचानक पूर्णपणे बदलले, आणि आता लोकांना घरून काम व घरातील काम अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून एका आठवड्याच्या आत मानसिक आरोग्यासंदर्भात नोंद करण्यात आलेल्या केसेसची संख्या 20% नी वाढली आहे. 

टाटा सॉल्ट लाईटतर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की, मुंबईकरांच्या बाबतीत राग आणि तणाव निर्माण होण्यामागील सर्वात पहिल्या कारणांमध्ये कामाशी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांचा समावेश होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी जवळपास 60% व्यक्तींनी असे मान्य केले की, जर त्यांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशी काम दिले गेले किंवा शुक्रवारी एखाद्या तातडीच्या कामासाठी उशिरापर्यंत काम करण्यास सांगितले गेले तर त्यांना खूप राग येईल, त्यांच्याकडून कामात चुका होतील किंवा वरिष्ठांसोबत वादावादी देखील होईल.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दर तीनपैकी दोन व्यक्तींनी (66%) असे सांगितले की त्यांचे वाय-फाय कनेक्शन किंवा इंटरनेट अचानक बंद पडले तर त्यांना राग आणि वैताग येतो. तर 51% व्यक्तींनी मान्य केले की त्यांचा फोन चार्ज होत असताना कोणी तो अनप्लग केला तर त्यांना खूप राग येतो.

जेवणाच्या वेळी कुटुंबियांसमवेत जेवणे हे एवढेच एक काम करा आणि आरोग्यदायक आहार घ्या. तुमच्या दररोजच्या जेवणात सहा धान्यांपासून बनवलेली खिचडी, विविध कडधान्यांपासून बनवलेले धिरडे किंवा घावन, कमी तेल शोषून घेणारे बेसन, लाल तांदुळाचे पोहे अशा पारंपरिक भारतीय पदार्थांचा समावेश आवर्जून करा. आपल्या जीवनशैलीमध्ये आरोग्याला लाभदायक ठरतील असे बदल करा. घरून काम करताना मध्ये-मध्ये जागेवरून उठणे, दर तासाला थोडेफार चालणे हे नक्की करा. रेस्टोरंट्समधून खाणे मागवण्यापेक्षा घरी बनवलेले भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ खा. घरी करता येईल असा एखादा व्यायाम प्रकार करा आणि दर रात्री सहा ते आठ तास शांत झोपा, असे टाटा न्यूट्रीकॉर्नर न्यूट्रिशनचे एक्स्पर्ट कविता देवगण म्हणाल्या. 
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार... 

आरोग्याला अपायकारक खाणे, तणाव, बैठे काम यामुळे हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग आणि मधुमेह यासारखे आहाराशी संबंधित असंसर्गजन्य (नॉन-कम्युनिकेबल) आजार होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आरोग्याला अपायकारक आहार आणि अपुरे पोषण या जगभरात असंसर्गजन्य आजारांना कारणीभूत ठरत असलेल्या सर्वात गंभीर बाबी आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com