मुंबई पोलिसांना पाहून पळताना आरोपी तिसऱ्या मजल्यावरुन पडला

तिसऱ्या माळ्यावरून दोरीच्या मदतीने उतरून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता.
mumbai police
mumbai policesakal

मुंबई: दिल्लीतील एका गुन्ह्यात (Delhi criminal) फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले होते. पण पोलिसांना (Police) पाहून पळ काढताना आरोपीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मालाडच्या (Malad) बांगूरनगर पोलिस ठाणे परिसरातील हरिद्वार सोसायटी एव्हरशाईन नगर मालाड (प) येथे ही घटना घडली.

या दुर्घटनेत डेविड हरी रॉय ४८ याचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील जानकीपुरी येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात डेविड हा स्पेशल टिमला हवा होता. दिल्लीमधील स्पेशल सेलचे पोलिस बांगूर नगर पोलिसा़ंच्यामदतीने डेविडला अटक करण्यासाठी आले होते. डेविड त्यांना पाहून पळत होता.

mumbai police
अमृता फडणवीसांच्या 'बिगडे नवाब' टि्वटला निलोफर मलिकने दिले उत्तर

त्यावेळी तिसऱ्या माळ्यावरून दोरीच्या मदतीने उतरून पळ काढण्याचा करत असताना, दोरी तुटुन डेविड खाली पडला आणि जखमी झाला. डेविडला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरा़नी सांगितले. या प्रकरणी बांगूरनगर पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com