Court
sakal
पालघर - डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या गंभीर प्रकरणात पालघर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी प्रमुल उर्फ प्रफुल्ल उर्फ प्रमोद रत्न घोसे याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. रहाणे यांनी विशेष खटला क्रमांक 33/2021 मध्ये हा निकाल दिला. मात्र, मृत्युदंडाची अंमलबजावणी होण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून शिक्षेची पुष्टी होणे आवश्यक आहे.