'मुघलांच्या काळातही वारकऱ्यांचे इतके हाल झाले नव्हते', आचार्य भोसलेंचा संताप

बंडा तात्यांना अटक करता, लाजवाटत नाही का या सरकारला?
'मुघलांच्या काळातही वारकऱ्यांचे इतके हाल झाले नव्हते', आचार्य भोसलेंचा संताप

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं (state govt) पायी वारीला (wari) परवानगी नाकारली आहे. पायी वारी करण्यावर ठाम असलेल्या बंडा तात्या कराडकर (Banda Tatya Karadkar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता राजकारण तापू लागलं आहे. भाजप (bjp) आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya tushar bhosale) यांनी, या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. (Acharya tushar bhosale slam thackeray govt over arrest of Banda Tatya Karadkar)

"औरंगाजेबापेक्षा ही काळ हे राज्यातल सरकार आहे. मुघलांच्या काळात सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल झाले नव्हते. इतके हाल या सरकारने केले. भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर नेणाऱ्या बंडा तात्यांना आणि वारकऱ्यांना तुम्ही अटक करता, लाज वाटत नाही का या सरकारला? तुमचं डोक ठिकाणावर आहे का?" असा सवाल आचार्य तुषार भोसले यांनी विचारला आहे.

'मुघलांच्या काळातही वारकऱ्यांचे इतके हाल झाले नव्हते', आचार्य भोसलेंचा संताप
तुरुंगातून सुटल्यानंतर 'भाई'ची जंगी मिरवणूक निघाली, पण...

"शिवसेनेला आता भगवा झेंडा हातात घेण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे आणि अजित पवार परिणाम भोगायला तयार राहा" असा इशारा तृषार भोसले यांनी दिला आहे. कालही त्यांनी पायी वारीला परवानगी न देण्याच्या निर्णयावरुन ठाकरे सरकारवर प्रखर टीका केली होती.

'मुघलांच्या काळातही वारकऱ्यांचे इतके हाल झाले नव्हते', आचार्य भोसलेंचा संताप
कल्याणमध्ये तरुणी आणि दोन तरुणांना जमावाकडून पट्ट्याने मारहाण

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे राज्य सरकारने मागच्यावर्षी प्रमाणे यंदाही पायी वारीला (wari) बंदी घातली आहे. कोरोनाचा (corona virus) फैलाव होऊ नय़े, यासाठी राज्य सरकारने (maharashtra govt) हा निर्णय घेतला आहे. पण यामुळे काही वारकऱ्यांमध्ये (warkari) अस्वस्थतता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com