विनाकारण बाहेर पडणे महागात; पोलिसांनी वाहनेही केली जप्त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

नवी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांना पकडण्याची कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्या 200 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. एकूण 332 लोकांना ताब्यात घेतले. तसेच 250 वाहने जप्त केली.

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांना पकडण्याची कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्या 200 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. एकूण 332 लोकांना ताब्यात घेतले. तसेच 250 वाहने जप्त केली.  

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी आपापल्या घरात राहणे गरजेचे आहे. शासनाने यासंदर्भात लागू केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

पोलिसांनी मागील आठवड्याभरात सुमारे 200 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच एकूण 332 लोकांवर कारवाई केली. 250 वाहने जप्त केली आहेत. यातील परिमंडळ-1 मध्ये 117 गुन्हे दाखल असून, 140 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच 70 वाहने जप्त करण्यात आली आहेत. परिमंडळ-2 मध्ये 80 गुन्हे दाखल असून, 192 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच 180 वाहने जप्त केली आहेत. नवी मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवाईनंतरदेखील अनेक नागरिक वाहन घेऊन विनाकारण फिरत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action against 332 persons in navi mumbai for coming out in lockdown