जेलमधील आमदार कदमांना पोलिस घेऊन गेले फ्लॅटवर; वाचा पुढे काय घडले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

ठाणे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई केली आहे. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास पवार आणि चार पोलिस कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी कासारवडवली येथील वाघबीळ नजीकच्या पुष्पांजली सोसायटीतील एका घरातून सुमारे 53 लाख 46 हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती.

मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ठाणे कारागृहात असलेल्या आमदार रमेश कदम याला कारागृहाबाहेर नेऊन फ्लॅटवर नेल्याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

ठाणे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई केली आहे. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास पवार आणि चार पोलिस कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वी कासारवडवली येथील वाघबीळ नजीकच्या पुष्पांजली सोसायटीतील एका घरातून सुमारे 53 लाख 46 हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. यावेळी त्याठिकाणी रमेश कदम देखील आढळून आला होता. रमेश कदमला कारागृहामधून बाहेर काढून खाजगी सोसायटीत घेऊन गेल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. 

रमेश कदमला जेजे रुग्णालयात तपासणीसाठी ठाणे कारागृहातून नेण्यात आले होते. मात्र तपासणी झाल्यावर पुन्हा तुरुंगात नेण्याऐवजी पोलिस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्याला ओळखीच्या एका माणसाच्या घरी नेले होते. त्याच वेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिकडे धाड टाकली. त्यामुळे रोख रक्कमेसह रमेश कदम आणि एक व्यक्ती पोलिसांना सापडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against 5 cops for taking under-trial MLA to private flat instead of jail