नवी मुंबईत लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिकेमध्ये विषाणूबाधित क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने 3 ते 14 जुलै या कालावधीत पुन्हा लॉकडाऊन लागु करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी लॉकडाऊनच्या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात केली आहे. गत तीन दिवसांमध्ये नवी मुंबई पोलिसांनी विविध कलमान्वये सुमारे 900 कारवाया केल्या आहेत. तसेच सुमारे 200 व्यक्तींची धरपकड केली आहे.

नक्की वाचा : दवाखाना नको रे बाबा! घरीच करतो तपासणी! ऑक्सिमीटर, थर्मामीटरसाठी सर्वाधिक गूगल सर्च

नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिकेमध्ये विषाणूबाधित क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पोलिसांनी नवी मुंबई पालिका हद्दीत 22 ठिकाणी तर पनवेल पालिका हद्दीत 17 ठिकाणी नाकाबंदी करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे.  

हे ही वाचापॅसेजमध्येच रुग्णांना ऑक्सिजन; डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार...

त्यानुसार पोलिसांनी गत तीन दिवसांमध्ये मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस काद्यानुसार एकूण 478 कारवाया केल्या आहेत. तर कलम 188 नुसार 100, मास्क न लावणे व सामाजिक अंतर न पाळणारे 52, विनाकारण फिरणारे नागरिक 88, मॉर्निंग-इव्हनिंग वॉक करणारे नागरीक 61, सामाजिक अंतर न पाळता आस्थापना सुरु ठेवणारे 2, नेमुन दिलेल्या वेळेत आस्थापना बंद न करणारे 5, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक करणार17, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींची जप्त करण्यात आलेली वाहने 94, अशा पद्धतीने कारवाई केली आहे. तसेच यातील सुमारे 200 लोकांची धरपकड देखील केली आहे. 

नक्की वाचाआमचाही बँक बॅलन्स आता झिरोवर, हॉटेल मालकांसह कर्मचाऱ्यांची हृदयद्रावक व्यथा -

ही कारवाई सुरुच राहणार असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक, गंभीर वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडु नये, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार करण्यात आलेली कारवाई                      

परिमंडळ -1, परिमंडळ -2,  एकुण     
 78                  400          478 

  • भादवि कलम 188 नुसार - 13 - 87 - 100 
  • मास्क न लावणे व सामाजिक अंतर न पाळणारे -   3 - 49 - 52 
  • विनाकारण फिरणारे नागरिक-  88 - 88 
  • मॉर्निंग-इव्हनिंग वॉक करणारे-  40 - 21 - 61 
  • सामाजिक अंतर न पाळता आस्थापना सुरु ठेवणारे - 02 - 02 
  • नेमुन दिलेल्या वेळेत आस्थापना बंद न करणारे - 05 - 05 
  • क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक करणारे - 3 - 14 - 17 
  • अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींची जप्त वाहने - 27 - 67 - 94 
  • एकूण - 164 - 733 - 897

Action to be taken against people violating lockdown in Navi Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action to be taken against people violating lockdown in Navi Mumbai