हे तर अजित पवारांना बदनाम करण्याचं कारस्थान - राष्ट्रवादी काँग्रेस

अजितदादा किंवा त्यांच्या कुटुंबाने कुठलेही बेकायदेशीर काम केलेले नाही.
Ajit Pawar
Ajit PawarSAKAL

मुंबई: साताऱ्यामधील (satara) कोरेगाव परिसरातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याशी (Jarandeshwar Cooperative Sugar Factory) (जरंडेश्वर एसएसके) संबंधित जमीन, इमारत, प्लांट, मशीन अशा 65 कोटी 75 लाख रुपयांच्या मालमत्तेवर गुरूवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) टाच आणली आहे. या कारखान्याचा संबंध उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्याशी जोडला जात आहे. (Action on jarandeshwar sugar mill issue this is conspiracy to malign th image of ajit pawar ncp)

आता या मुद्यावरुन राजकारण सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हे अजित पवारांना बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचं म्हटलं आहे. "ईडीच्या माध्यमातून अजित पवार आणि त्यांच्या कुटुबीयांच्या बाबतीत बातम्या पेरल्या जात आहेत. साखर कारखाना जप्त केला. जी काही कायदेशी कारवाई सुरु असेल. अजितदादा किंवा त्यांच्या कुटुंबाने कुठलेही बेकायदेशीर काम केलेले नाही. ईडीला काही माहिती हवी असेल तर ती त्यांना देण्यात येईल. ज्या पद्धतीने बातम्या पेरण्यात येत आहे, त्यावरुन आमच्या नेत्याला, पक्षाला बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे" असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar
"ठाकरेंचे पवारांप्रमाणेच सोनिया गांधींशीही जिव्हाळ्याचे संबंध"

नेमकं काय आहे प्रकरण?

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Deputy Chief Minister Ajit Pawar) मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर ही जप्तीची कारवाई करण्यात आलीय. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी सहकारी कारखाना होता. मात्र, महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. नंतर तो कारखाना खाजगीरित्या विकत घेतला गेला आला. अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत होते.

Ajit Pawar
राज्यपाल कोश्यारींच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे पत्रानेच उत्तर

ही मालमत्ता सध्या गुरू कमोडिटी सर्व्हिस प्रा. लि. यांच्या नावावर आहे. ती जरंडेश्वर साखर मिल, मेसर्स स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि. यांना लीजवर देण्यात आली होती. जरंडेश्वर साखर मिलमध्ये स्पार्कलिंग सॉईलचे बहुसंख्य शेअर्स आहेत. स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि. ही कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ईडीने सांगितलेय. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यांच्या मालकांनी महाराष्ट्र राज्य सहकार बँकेकडून कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं. नंतर त्या साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला. या साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. त्याअनुषंगाने ईडीने केलेली ही मोठी कारवाई आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com