
Maharashtra Budget Session 2023: राऊतांवर कारवाई होणार! हक्कभंग समितीची पुनर्रचना; भातखळकर, राणेंचाही समावेश
मुंबई : राज्य विधीमंडळाचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आजच्या दिवस हा हक्कभंगांच्या चर्चेवरुन गाजला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी आता विधीमंडळ हक्कभंग समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. (Action will be taken against Raut disInfringement of rights Committee formed)
यामध्ये राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखालील १५ सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विविध पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. आमदार अतुल भातखळकर, नितेश राणे, योगेश सागर, अमित साटम, अभिमन्यू पवार, संजय शिरसाट, सदा सरवणकर, दिलीप मोहिते पाटील, माणिकराव कोकाटे, सुनील भुतारा, सुनील केदार, नीतीन राऊत, विनय कोरे आदी आमदारांचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं संजय राऊतांविरोधात सत्ताधारी आमदारांनी हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यावर आज दिवसभर विधानसभेत जोरदार खडागंजी झाली.
हे ही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
तर विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधी आमदारांना उद्देशून "बरं झालं आम्ही देशद्रोह्यांसोबत चहापान केलं नाही" अशी टिप्पणी केली होती. त्यामुळं आता मुख्यमंत्री शिंदे देखील अडचणीत आले आहेत.