रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्याने कार्यकर्ते संतप्त! मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा 

मिलिंद तांबे
Tuesday, 12 January 2021

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे राज्य सरकारविरोधात कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे

मुंबई  : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे राज्य सरकारविरोधात कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याविरोधात मंगळवारी (ता. 12) रोजी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आणि मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी आठवले यांच्या सुरक्षेत वाढ केली नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी आरपीआयने आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

अन्याय होईल तिथे सर्वप्रथम पोहोचणारे, सर्व जाती-धर्माच्या गरिबांना, गरजूंना, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणारे अशी ओळख आठवले यांची आहे. त्यांची लोकप्रियता सतत वाढत असल्याने काही समाजकंटकांनी त्यांच्या सभा, दौऱ्यात दहशत माजवल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. त्यांच्यावर मागील वर्षी अंबरनाथ येथे हल्ल्याचाही प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आठवले यांना झेड सुरक्षा देणे आवश्‍यक असताना त्यांच्या सुरक्षेत कपात करून महाविकास आघाडी सरकारने सूड उगवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. सुरक्षा कपात करण्यावर फेरविचार करण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्यात यावेत, या मागणीसाठी लवकरच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील रिपाइंचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेणार आहे.

Activists angry over reduction in security of Ramdas Athavale

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Activists angry over reduction in security of Ramdas Athavale