esakal | Video: रजनीकांत यांना मराठीत बोलताना पाहिलंय का? नाही? येन्ना रास्कला वॉच इट
sakal

बोलून बातमी शोधा

Video: रजनीकांत यांना मराठीत बोलताना पाहिलंय का? नाही? येन्ना रास्कला वॉच इट

पाहा रजनीकांत यांचा मराठी बाणा

Video: रजनीकांत यांना मराठीत बोलताना पाहिलंय का? नाही? येन्ना रास्कला वॉच इट

sakal_logo
By
श्रेयस सावंत

रजनीकांत, फक्त नावच पुरेसं आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही जी रजनी सरांना जमत नाही. एकावेळी कितीही व्हिलन समोर येउंद्या, रजनी सरांची फायटिंग एक नंबर. बोले तो, एकंच फाईट वातावरण टाइट. असा एकही सिनेमा नाही ज्याच्या आधी रजनी सरांच्या मुर्त्यांचा दूधाने अभिषेक झाला नसेल. एक असा अभिनेता ज्यांचा सिनेमा चित्रपटगृहात येण्याआधीच चित्रपट गृहाबाहेर हाऊस फुलचा बोर्ड  पाहायला मिळतो म्हणजे मिळतोच. अभिनेते रजनीकांत म्हणजे साक्षात देव अशी त्यांच्या अनेक चाहत्यांची भावना आहे. पण जेवढे रजनीकांत मोठे, तेवढेच ते साधे देखील आहेत. आणि याचाच अनुभव आज मुंबईतल्या पत्रकारांना आला.   

सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'दरबार'चा म्युझिक  लॅांच सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या सिनेमासाठी रजनीकांत यांनी बहुदा पहिल्यांदा संपूर्ण सिनेमा पहिल्यांदा मुंबईत शूट केला आहे. या निमिताने रजनीकांत यांचा मराठी बाणा पाहिला मिळाला. 

महत्त्वाची बातमी :  धक्कादायक ! 'या' आजारामुळे महाराष्ट्रात दररोज 17 लोकं गमावतात जीव..

त्याचं झालं असं की रजनीकांत यांनी एका सिनेमाचं मुंबईत शूट केलंय. दरबार (Darbar) या सिनेमामध्ये रजनीकांत यांनी पोलिसांची भूमिका साकारली आहे. आणि याच अनुषंगाने एक पत्रकारानी रजनीकांत यांना मराठीत प्रश्न विचारला. यावर रजनीकांत यांनी मराठीत उत्तर दिलंय 

पत्रकाराने रजनीकांत यांना मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस यांना काय सांगाल असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, "मी मराठी बोलतो, पण माझं मराठी बेळगावचं आहे. आम्ही घरातही मराठी बोलतो. एकदा मला मराठी सिनेमात काम करण्याची ऑफर देखील आली होती. एकदा मला मराठी चित्रपटात काम करायचंय, बघू काय होतं", असं रजनीकांत यांनी म्हटलंय.

एक मिनिट नुसतं वाचू नका, हा व्हिडीओ पण पाहा... 

महत्त्वाची बातमी PHOTO : घरातच त्यानं थाटली 'गांजा लॅब', लॅब पाहून पोलिसही चक्रावलेत..

मग, रजनी सरांना मराठी बोलताना पाहून वाटलं ना भारी. आता रजनीकांत यांचा सिनेमा हिट तर होणारच. आणि त्यातही मुंबईत शुटींग झालंय, त्यामुळे मुंबई महाराष्ट्राचे लोकही 'दरबार' सिनेमा पाहायला जाणार हे नक्की.

ट्रेलर तर तुम्ही पहिलाच असेल? काय, नाही पहिला.. लगेच पाहा, खालीच तर आहे.. 

WebTitle :  actor rajanikath speaking in marathi during music launch of his upcoming darbar cinema

loading image
go to top