esakal | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Big boss 13 fam siddharth shukla  tweet

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आणि 'बिग बॉस १३' या रिअॅलिटी शोचा विजेता सिद्धार्थ शुक्ला Siddharth Shukla याचे आज (गुरुवारी) निधन झाले. ४० वर्षीय सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कूपर हॉस्पिटलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सिद्धार्थने 'बालिका वधू' आणि 'दिल से दिल तक' यांसारख्या मालिकांत काम केलं होतं. तर 'झलक दिखला जा 6', 'फिअर फॅक्टर', 'खतरों के खिलाड़ी' यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.

गुरुवारी सकाळी सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात दाखल करताच त्याला मृत घोषित करण्यात आले. कूपर हॉस्पिटलने 'पीटीआय'ला याबद्दलची माहिती दिली. सिद्धार्थच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा कुटुंब आहे.

सिद्धार्थने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 'बाबुल का आंगन छुटे ना' या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'जाने पहचाने से.. ये अजनबी', 'लव्ह यू जिंदगी' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. मात्र 'बालिका वधू' या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला.

सिद्धार्थने बऱ्याच रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. 'झलक दिखला जा ६', 'खतरों के खिलाडी ७' आणि 'बिग बॉस १३' मध्ये तो झळकला होता. 'बिग बॉस ३'चं विजेतेपद त्याने पटकावलं होतं. २०१४ मध्ये सिद्धार्थने करण जोहर निर्मित 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

loading image
go to top