ब्रेकिंग: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 14 June 2020

  • अभिनेता सुशांत सिंह राजपूत ची आत्महत्या
  •  वांद्रयातील घरी गळफास घेऊन केली आत्महत्या
  • सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरी आत्महत्या केली आहे. 34 वर्षीय अभिनेत्याच्या आत्महत्येनं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. वांद्र्यातल्या राहत्या घरी त्यानं आपलं जीवन संपवलंय. सुशांतनं नैराश्यात ही आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एमएस धोनी, छिछोरे यासारख्या सिनेमात त्यानं काम केलं आहे.

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पवित्र्य रिश्ता या टीव्ही मालिकेतून प्रकाश झोतात आलेल्या सुशांतने वयाच्या 34 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडल्याचे बोलले जात असून त्यातून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल. पाच दिवसांपूर्वीच सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिनेी मालाड येथील इमारतीवरून आत्महत्या केली होती. 14 व्या मजल्यावर तिने उडी मारली असून याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. त्याचा पाच दिवसानंतरच सुशांतने हे पाऊल उचलले. उपायुक्त (कक्ष-9) अभिषेक त्रिमुखे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावरील चित्रपटातून सुशांतने आपली वेगळी ओळख बनवली होती. त्यानंतर छिछोरे या चित्रपटातही सुशांतच्या कामाची विशेष चर्चा झाली. करिअरच्या शिखरावर असताना त्याने उचललेल्या या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Sushant Singh commits suicide by strangling a Rajput

Tags
टॉपिकस
Topic Tags: