esakal | पाकव्याप्त काश्मीरचे वक्तव्य मान्य नाही, न्यायालयाकडून कंगनाचीही कानउघडणी
sakal

बोलून बातमी शोधा

पाकव्याप्त काश्मीरचे वक्तव्य मान्य नाही, न्यायालयाकडून कंगनाचीही कानउघडणी

कंगनाने भविष्यात असे ट्विट करण्यापासून स्वतःला रोखावे, अशा शब्दांत न्यायालयानं कंगनाला  समज दिली आहे. कंगना राणावतनं मुंबई पाकव्याप्त भाग आहे अशा आशयाच ट्विट केलं होतं. तसंच मुंबई पोलिसांबद्दलही तिनं त्या ट्विटमध्ये उल्लेख केला होता.

पाकव्याप्त काश्मीरचे वक्तव्य मान्य नाही, न्यायालयाकडून कंगनाचीही कानउघडणी

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावतच्या घरातील  अनधिकृत बांधकाम  प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं कंगनाला दिलासा दिला आहे. तर मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. महापालिकेने आकसाने आणि कुहेतुने कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. शिवाय पाडकाम केलेल्या जागेची भरपाई देण्याचेही न्यायालयाने दिले आहे. दरम्यान पालिकेसोबत न्यायालयानं कंगनालाचीही कानउघडणी केली आहे.

कंगनालाही व्यक्ती आणि ठाकरे सरकारविरोधात टीका करण्यावरुन बजावले आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे, सरकारच्या विरोधात विधाने करणे या कंगनाच्या कृतीला मुंबई उच्च न्यायालय मान्यता देत नाही. त्याच्याशी न्यायालय सहमत नाही. कंगनाने भविष्यात असे ट्विट करण्यापासून स्वतःला रोखावे, अशा शब्दांत न्यायालयानं कंगनाला  समज दिली आहे. कंगना राणावतनं मुंबई पाकव्याप्त भाग आहे अशा आशयाच ट्विट केलं होतं. तसंच मुंबई पोलिसांबद्दलही तिनं त्या ट्विटमध्ये उल्लेख केला होता. या ट्विटवरुन शिवसेना विरुद्ध कंगना असा वाद पेटला होता. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई पालिकेला न्यायालयाचा दणका

महापालिकेने आकसाने आणि कुहेतुने कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. शिवाय पाडकाम केलेल्या जागेची भरपाई देण्याचेही न्यायालयाने दिले आहे.

कंगनाने मागितलेली दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई बाबतीत न्यायालयाने स्वतंत्र सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका आणि कंगनाची बाजू मूल्यांकन करुन तीन महिन्यात निर्णय देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या विधानांचा समाचार ही खंडपीठाने घेतला असून नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका अधिकारयानी तातडीने केलेली कारवाई, सामनामध्ये आलेले वृत्तांकन यावरुन दुषित हेतू स्पष्ट होतो. यामुळे नागरिकांच्या अधिकारात बाधा येते असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. महापालिकेने बजावलेल्या पाडकामाबाबत दोन्ही नोटीस न्यायालयाने रद्दबाबत केल्यात.

अधिक वाचाः  र हात धुवून मागे लागेन, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना थेट इशारा

मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामावर पाडकामाची कारवाई केली होती. याविरोधात तिनं उच्च न्यायालयात याचिका केली असून दोन कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  पालिकेने आकसाने वैध बांधकाम पाडले, असा दावा तिने केला होता.

मात्र महापालिकेच्या युक्तिवादात बांधकाम कारवाई नियमानुसार असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही तिने व्यक्तिगत आरोप केलेत. मात्र या आरोपांचे खंडन राऊत यांनी केले आहे. याचिकेवर न्या शाहरुख काथावाला आणि न्या रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली आणि खंडपीठाने आज निकाल जाहीर केला.

Actress Kangana Ranaut was also warned by the bombay High Court

loading image
go to top