esakal | कंगना राणावतच्या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी - HC
sakal

बोलून बातमी शोधा

kangana Ranaut

कंगना राणावतच्या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी - HC

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या (kangna Ranaut) दोन्ही याचिकांवर (Petition) एकत्रित सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) निश्चित केले आहे. आक्षेपार्ह ट्विट (Meaningless twit) केल्याच्या आरोपात तिच्याविरोधात गुन्हा दाखल (FIR) झाला आहे. कंगनाच्या विरोधात वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) गुन्हा नोंदविला आहे. आक्षेपार्ह ट्विट करुन सामाजिक शांतता भंग केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने यासंबंधीची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई रद्द करण्याची मागणी तिने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. न्या एस एस शिंदे यांच्या खंडपीठाने या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी ता. 26 रोजी घेण्याचे निश्चित केले. यामध्ये बाजू माडण्यासाठी अनेक अर्ज आले आहेत, असे खंडपीठ म्हणाले. मुंबईबाबत कंगनाने टीकात्मक ट्विट केले होते. ( Actress kangna Ranut case two petitions will be announce at a time says Mumbai High Court)

loading image