अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

अभिनेत्री सेजल शर्मा (वय 24 ) हिने आज सकाळी मीरारोड येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुंबई : अभिनेत्री सेजल शर्मा (वय 24 ) हिने आज सकाळी मीरारोड येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्‍यातून आपण आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. स्टार प्लस वाहिनीवरील "दिल तो हॅप्पी है' या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत होती.

महत्वाचे : अदिवासी तरुणाच्या प्रबंधाचे जर्मनीत पुस्तक

मीरा रोडच्या पूर्वेकडील शिवार गार्डन परिसरातील रॉयल नेस्ट या इमारतीत ती मैत्रीणीसोबत राहात होती. आज सकाळी घरातील पंख्याला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. गेल्या दीड महिन्यांपासून नैराश्‍यात असल्याने आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहून ठेवले. सेजल राजस्थानच्या उदयपूर येथील मूळ रहिवासी असून 2017 मध्ये ती मुंबईला आली होती. तिची मालिका काही महिन्यांपूर्वी बंद झाल्यानंतर ती नैराश्‍यात होती, असे पोलिसांनी सांगितले.

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तिच्या आत्महत्येमागे आणखी काही खाजगी कारणे आहेत का, त्याचा शोध सुरु आहे, असे मीरा रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप कदम यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Sejal Sharma's suicide