अमली पदार्थांची बॅटमधून तस्करी

Bats
Bats

मुंबई - क्रिकेट बॅटमध्ये चोरकप्पा तयार करून परदेशातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाला (एनसीबी) यश आले आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कतारहून कुरिअरमार्फत हे अमली पदार्थ भारतात पाठविण्यात आले होते.

अंधेरीतील कुरिअर कंपनीच्या मदतीने परदेशातून चरस मागविण्यात येत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या पथकाने छापा टाकून चौघांना अंधेरीतून आणि एकाला विमानतळावरून अटक केली. सुरक्षा यंत्रणांना संशय येऊ नये, यासाठी अमली पदार्थ तस्करांची टोळी या पद्धतीचा वापर करीत होती. एनसीबीने आरोपींकडून लायरिका कॅप्सूलची ८३ पाकिटे व २.७ किलो चरस असे अमली 
पदार्थ जप्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com